मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चार तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत असून वांद्रे पोलिसांनी आज सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची तब्बल सहा तास चौकशी केली. रिया चक्रवर्ती आज सकाळी साडे अकराच्या सुमारास वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर झाली होती.
पोलिसांनी जवळपास सहा तास रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवून विचारपूस केली. वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास संपला. या चौकशीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर रियाकडून माहिती विचारण्यात आली. या जबाब नोंदणीनंतर आता संबंधित विभागाचे डीसीपी हे सुद्धा रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
त्याआधी पोलिसांनी बुधवारी कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्रा यांचा जबाब नोंदवला आहे. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. तसेच पोलिसांनी सुशांतच्या चार-पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय आर्थिक आणि त्याच्या चित्रपटाशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही जणांना पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहोत.
दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत दहाहून अधिक जणांची चौकशी केली आहे. यात त्यांच्या वडीलांचाही जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.