ICC Men’s T20I Team of the Year for 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 सालचा सर्वोत्कृष्ट T20 संघ जाहीर केला आहे. आयसीसीने भारताच्या सूर्यकुमार यादवला या संघाचा कर्णधार बनवले आहे. सूर्याशिवाय भारताच्या यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग हे देखील या संघात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा या संघात समावेश नाही.
या आयसीसी संघात भारताचे 4, झिम्बाब्वेचे दोन, इंग्लंडचे एक, वेस्ट इंडिजचा एक, आयर्लंडचा एक आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ICC ने 2023 च्या सर्वोत्कृष्ट T20 संघात युगांडाच्या एका खेळाडूची देखील निवड केली आहे. त्याचवेळी ICC ने आपल्या सर्वोत्तम T20 संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.
ICC ने भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची 2023 च्या सर्वोत्तम T20 मध्ये निवड केली आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आणि वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारवा देखील या संघाचा भाग आहेत.
न्यूझीलंडचा मार्क चॅपमन आणि आयर्लंडचा अष्टपैलू मार्क अॅडायर यांचीही आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघात निवड केली आहे. याशिवाय, आयपीएल 2024 मध्ये विक्री न झालेला इंग्लंडचा फिल सॉल्ट देखील या संघाचा एक भाग आहे.
दरवर्षी ICC तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. जगभरातील 11 खेळाडूंना या संघांमध्ये स्थान मिळते. संघाव्यतिरिक्त, आयसीसी प्रत्येक फॉरमॅटमधील एक सर्वोत्तम खेळाडू देखील निवडते.
Breakout stars and household names 📝
Presenting the ICC Men’s T20I Team of the Year for 2023 🙌https://t.co/z1kI3DuGId
— ICC (@ICC) January 23, 2024
2023 चा सर्वोत्कृष्ट T20 संघ – यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा आणि अर्शदीप सिंग.