Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला होता. त्या निकालाला केजरीवालांच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. परंतु त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही.
कोर्टाला आता पुढील चार दिवस सुट्ट्या असल्याने त्यांची सुनावणी आता सोमवार पर्यंत पुढे गेली आहे. त्यामुळे आता केजरीवालांना पुढील चार दिवस तरी तिहार मध्येच काढावे लागतील अशी स्थिती आहे. । Arvind Kejriwal
केजरीवालांचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी आज कोर्टापुढे केजरीवालांची आव्हान याचिका दाखल केल्यानंतर त्यावर आजच तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती सुप्रिम कोर्टाला केली होती.
त्यावर दुपारच्या सत्रात विचार करण्याचे सरन्यायाधिशांनी मान्य केले होते पण नंतर आज या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे ही सुनावणी आता सोमवार पर्यंत लांबणीवर पडली आहे.
कोर्टाला गुरूवारी ईदची सुट्टी आहे, शुक्रवारी स्थानिक सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार रविवारची सुट्टी असल्याने चार दिवस ही सुनावणी पुढे ढकलली गेली. । Arvind Kejriwal