वाल्हे – आडाची वाडी (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सूरज पवार यांची मंगळवारी (दि. 17) बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. अलका पवार यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.
सरपंच दत्तात्रय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंचपदासाठी सुरज पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेविका वैशाली पानसरे यांनी जाहीर केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी पवार, सरपंच दत्तात्रय पवार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुरज पवार यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
यावेळी माजी उपसरपंच अलका पवार, सुप्रिया पवार, शितल पवार, मंदाकिनी पवार, जयवंत पवार, मोनाली पवार, हनुमंत पवार, रोहिणी पवार, गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच दत्तात्रय पवार यांनी आभार मानले.