Supriya Sule । देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर देशभरातील पक्षांनी या निवडणुकीसाठी आपापला उमेदवार मैदानात उभा केला आहे. राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आलाय. याठिकाणी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा व्हाट्सअप स्टेटस सर्वांचे लक्ष वेधत आहे.
विरोधकांना थेट इशाराच Supriya Sule ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या सध्या आपल्या मतदार संघात प्रचार करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवारही तेवढ्याच जोमाने प्रचाराला लागल्यात. दोघी नणंद-भावजयमध्ये होणारी हि निवडणूक संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसला एक फोटो ठेवला आहे. ज्याद्वारे त्यांनी विरोधकांना थेट इशाराच दिल्याचे दिसतय.
“शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो Supriya Sule ।
शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवला आहे. आणि त्याच्या खाली “येऊ दे कितीबी…”असा मजकूर लिहिला आहे. त्यांच्या या व्हाट्सअप स्टेटसवरून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे विरोधकांना सांगितले. एवढंच नाही तर त्यांनी विरोधकांना या फोटोच्या माध्यमातून थेट आव्हानच दिल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गेली तीन टर्म खासदार सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांच्यापुढे घऱातूचन भावजय सुनेत्रा पवार यांच्या रुपाने बलाढ्य आव्हान उभे राहिले आहे. बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एकहाती अंमल आहे. गत निवडणूकीत बारामतीच्या जोरावरच सुळे विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांना येथे मोठी मेहनत घ्यावी लागेल.
हेही वाचा
बारामतीतील लढाई अखेर ‘नणंद-भावजयी’तच होणार; शरद पवार, अजित पवारांचा लागणार राजकीय कस