supriya sule – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. निकाल देताना नार्वेकर यांनी, विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेतला.
विधिमंडळामध्ये बहुमत अजित पवार यांच्याकडे असल्याचा उल्लेख करत विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांचाच गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. । Supriya Sule
अजित पवार गटाचे आमदारही त्यांनी यावेळी पात्र असल्याचा निर्वाळा केला आहे. निकालापूर्वीच शरद पवार गटातील नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून विधानसभा अध्यक्षांचा निकाल त्यांच्यासाठी अपेक्षितचं होता असं म्हणावं लागेल.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निकालावर आता शरद पवार गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अश्यातच, खासदार सुप्रिया सुळे यांनी हा पूर्णपणे कॉपी पेस्ट असल्याची प्रतिक्रिया दिली. या निकालामुळे मला कोणताही धक्का किंवा आश्चर्य बसलेलं नाही अशी असंही सुळे म्हाणाल्या. । Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या, नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल देखील सुळे यांनी उपस्थित केला. कायदे मोडूनच सध्या काम सुरु आहे. कोणत्या पक्षात दडपशाही सुरु आहे हे जनतेला माहित आहे.
आजचा निर्णय हा पूर्णपणे कॉपी पेस्ट असल्याचे सुळे म्हणाल्या. अदृश्य शक्तीच्या आदेशाववरुन हा निकाल देण्यात आला असल्याचं यावेळी त्या म्हणाल्या.