Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे.अशात त्यांच्या चिमुकलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे सगळं या नालायक सरकारमुळे घडत असल्याचा संताप जरांगे यांच्या लेकीनं व्यक्त केला आहे. | Manoj jarange patil maratha reservation
मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय? असा सवाल केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.यावेळी ‘मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा…’, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत.
“हे सगळं जे काही घडतंय ते नालायक सरकारमुळे घडत आहे. सरकारने येऊन त्यांचं उपोषण सोडवावं. मला खूप भीती वाटत आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मुलीने दिली आहे. | Manoj jarange patil maratha reservation
पप्पांना काही झालं तर या सरकारच राजकिय करिअर उध्वस्त होईल. मी पप्पांना सांगितलं होतं उपोषण करू नका. पण, समाजाच्या वेदना मोठ्या आहेत त्यामुळे पप्पांना उपोषण करावं लागलं अशा भावना देखील यावेळी जरांगे यांच्या लेकिन व्यक्त केल्या. आरक्षण नाही दिलं तर एक मुलगी काय करू शकते हे दिसेल असा इशाराही तिने यावेळी दिला.
कोर्टात काय-काय घडलं? ( Manoj Jarange Patil )
मनोज जरांगे यांच्या उपचारासाठी 2 डॉक्टर आहेत. जरांगेंना काल दोनवेळा सलाईन लावण्यात आली, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला. यावेळी महाधिवक्तांनी मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत, अशी माहिती हायकोर्टात दिली. | Manoj jarange patil maratha reservation
यावर हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलं. उपोषणस्थळी डॉक्टर असणं, सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं असं होत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. उपचार घेण्यात जरांगेंना अडचण काय? असा सवालही हायकोर्टाने केला.