नवी दिल्ली – कॉंग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी अदानी समूहाचे गेैरव्यवहार प्रकरण आणि त्याच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाच्या अनुषंगाने चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. तथापि या प्रकरणात आधीच ज्या दोन याचिका सादर करण्यात आल्या आहेत, त्याची सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे जया ठाकूर यांच्या याचिकेचीही त्याचवेळी सुनावणी घेण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
यापूर्वी हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित आणखी दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक याचिका अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. ज्यात त्यांनी हिंडेनबर्ग संशोधन अहवालाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसरी एक याचिकाकर्ता, अधिवक्ता एम. एल. शर्मा यांनी केली असून त्यात त्यांनी अमेरिकास्थित हिंडेनबर्ग फर्मच्या विरोधातच चौकशीची मागणी केली आहे.
Adani case : अदानी प्रकरणात कॉंग्रेसची ‘RBI’ व ‘SEBI’कडे धाव; पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
आज याचिका सादर करणाऱ्या जया ठाकूर या मध्य प्रदेशातील महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी अदानी समूहाच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) मध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैसे गुंतवण्याच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणांना निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे.