कोविशिल्डच्या 66 कोटी डोसचा पुढील 3 महिन्यांत पुरवठा; सीरम इन्स्टिट्यूटची ग्वाही

नवी दिल्ली – कोविशिल्ड या करोनावरील लसीच्या 66 कोटी डोसचा पुरवठा पुढील तीन महिन्यांत केला जाणार आहे. कोविशिल्डचे उत्पादन करणाऱ्या पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूटने तशी ग्वाही केंद्र सरकारला दिली आहे.

केंद्र सरकार आणि खासगी रूग्णालयांना सीरमकडून पुढील महिन्यात (ऑक्‍टोबर) सुमारे 22 कोटी डोस उपलब्ध केले जातील. चालू वर्षाच्या प्रारंभापासून ते 19 सप्टेंबर अखेरपर्यंत सीरमने केंद्र सरकारला कोविशिल्डचे 66 कोटी 33 लाख डोस पुरवले.

त्याशिवाय, संबंधित कालावधीत राज्य सरकारांना आणि खासगी रूग्णालयांना 7 कोटी 77 लाखांहून अधिक डोस देण्यात आले. चालू वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत 66 कोटी डोसची ऑर्डर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सीरमने समोर ठेवले आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून वर्षभरात पुरवल्या जाणाऱ्या डोसची संख्या 130 कोटींवर जाईल.

आतापर्यंत देशातील नागरिकांना करोनालसींचे 82 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविशिल्डचा वाटा सुमारे 88 टक्के इतका आहे. कोव्हॅक्‍सिनचा 11 टक्‍क्‍यांहून अधिक, तर स्पुटनिक-व्हीचा 1 टक्‍क्‍यापेक्षा कमी वाटा आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.