“मी पोलीस आयुक्‍ताला सोडले नाही, तू काय चीज आहेस’

बढाया मारत धमकावणाऱ्या टोळक्‍यावर गुन्हा,तिघांना अटक

पिंपरी – “माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत, मी पोलीस आयुक्ताला सुद्धा सोडले नाही, तर तू काय चीज आहे’ अशा बढया मारत महिलेला संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी 15 जणांच्या टोळक्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.

दिलीप रामभाऊ गायकवाड (वय अंदाजे 45), गणेश गायकवाड (वय अंदाजे 32), संकेत गायकवाड (वय अंदाजे 25), सचिन गायकवाड (वय अंदाजे 30), अमित बुरुटे (वय अंदाजे 23), ऋषिकेश उर्फ गांग्या (वय अंदाजे 23), किरण रणपिसे (वय अंदाजे 30), दीपक कांबळे (वय 35), चार महिला आणि दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 20) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या बंगल्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन शिवीगाळ केली.

आरोपी दिलीप गायकवाड फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत अश्‍लील शिवीगाळ केली. त्याने फिर्यादी यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम दहशतीने थांबवण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या मुलाला गायब करून जीवे मारण्याची धमकी देत दीपक कांबळे याने फिर्यादी यांना ‘माझ्या सर्व ठिकाणी वरपर्यंत ओळखी आहेत, मी पोलीस आयुक्ताला सुद्धा सोडले नाही तर तू काय चीज आहे. तुला संपवून टाकेल’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.