पत्नीबाबत अश्‍लील कमेंट केल्याने मित्राचा खून; पिंपरी-चिंचवड येथील घटना

पिंपरी – मित्राने पत्नीबाबत अश्‍लील बोलल्याने त्याचा खून केल्याची घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी उघडकीस आली. अच्युत भुयान (वय 37), असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कमल राजन शर्मा (वय 18, दोघेही रा. सूस रोड, बाणेर, पुणे) याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अच्युत भुयान याने आरोपी शर्मा याच्या पत्नीबाबत अश्‍लील कमेंट केली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. सोमवारी (दि. 20) सायंकाळी कामावरून आल्यानंतर अच्युत आणि कमल दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी अच्युत याने पुन्हा कमलच्या पत्नीबाबत अश्‍लील कमेंट केली. या कारणावरून संतापलेल्या आरोपी शर्मा याने लांब रूमालाच्या सहाय्याने अच्युत याचा गळा आवळून खून केला.

दोघेजण एका सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला होते. सोमवारी सायंकाळी स्वयंपाक बनविणारी महिला आरोपीच्या घरी आली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडे आरोपीबाबत कोणताही पुरावा नव्हता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि एका लहान मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयाची सुई आरोपी शर्मा याच्याकडे वळाली. आरोपी मूळगावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना हिंजवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत त्याला अटक केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.