मुंबई – तीन दिवसांपूर्वीच थलाईवा सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्सहात साजरा केला. रजनीकांत यांनी देखील आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. नुकतंच रजनीकांत यांनी तिरुपती मंदिराला भेट दिली. यावेळी रजनीकांत यांनी मनोभावे श्री व्यंकटेश्वराचे दर्शन देखील घेतले. या दरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
सुपरस्टार अशी ओळख असलेले रजनीकांत आपल्या चित्रपटांमध्ये अनेक अशक्य कामे आणि अफाट फायटिंग सिन करताना दिसून येतात. साऊथचे चाहते म्हणूनच कदाचित रजनीकांत यांना खूप मानतात. परंतु रजनीकांतचे देवासमोर नतमस्तक होण्याचे येऊ रूप देखील आज चाहत्यांना पाहायला मिळाले. यावेळी रजनीकांत यांचयासोबत त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील होती.
Three days after his 72nd birthday, Superstar @rajinikanth visited Lord #SriVenkateswaraSwami temple at Tirumala with his daughter @ash_rajinikanth on early morning today.#Tirupati #Rajnikanth #Tirumala #SuperstarRajinikanth #AishwaryaRajinikanth#AndhraPradesh pic.twitter.com/mfOR3gilr3
— Surya Reddy (@jsuryareddy) December 15, 2022
रजनीकांत आणि ऐश्वर्याचे मंदिरातील अधिकाऱ्यांनी देखील यावेळी स्वागत केले. मंदिरातील पुरोहितांसोबत रजनीकांत यांनी धार्मिक विधी देखील केल्याचे समजते.रजनीकांत यांनी ७२ व्या वर्षात पदार्पण केले असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास दर्शन घेण्यासाठी ते मंदिरात हजर होते. रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात ऐश्वर्या रॉय बच्चनची देखील महत्वाची भूमिका असणार आहे.