मुंबई – साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सध्या त्याच्या आगामी ‘जेलर’ या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, अभिनेत्याने त्याची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शित “लाल सलाम” चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात अभिनेता ‘मोईदीन भाई’ची छोटी भूमिका साकारत आहे. शूट संपल्यानंतर ऐश्वर्याने लाल सलामच्या सेटवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. या फोटोत विष्णू विशाल आणि जीविता सारखे कलाकारही दिसत आहेत. यावेळी सुपरस्टार रजनीकांतचा आगळावेगळा लूक देखील पाहायला मिळत आहे. अंगात कुर्ता डोक्यावर टोपी अशा भाईजान अवतारातील रजनीकांत यांच्या लूकची चाहत्यांना देखील चांगलीच भुरळ पडली आहे.
‘लाल सलाम’मधून ऐश्वर्या सात वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. लायका प्रॉडक्शनने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज होणार आहे. तथापि, अधिकृत प्रकाशन तारखेची प्रतीक्षा आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिल आहे.
SuperStar 🌟 Signs Off in Style! The team rejoices 🥳 as the shooting for #MoideenBhai‘s portion is wrapped! 🤗
🌟 @rajinikanth
🎬 @ash_rajinikanth
🎶 @arrahman
💫 @TheVishnuVishal & @vikranth_offl
🎥 @DOP_VishnuR
⚒️ @RamuThangraj
✂️🎞️ @BPravinBaaskar
👕… pic.twitter.com/XsAdUKdOwP— Lyca Productions (@LycaProductions) July 12, 2023
कामाच्या आघाडीवर, रजनीकांत लवकरच नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन आणि वसंत रवी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 10 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.