नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २६ वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. नुकतंच आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी त्याचवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाला होता.
मात्र, या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी माहिती समोर येत असून, यामुळे सर्वांच्याच भुवया उंचगावल्या आहेत. सध्या आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या हत्याकांडात एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब पुनावालाने जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रकरणाला आणखी गती मिळाल्याचं दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती.
त्याशिवाय, आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मी आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल मला अप्सरा…
दरम्यान, पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चौकशी दरम्यान आफताबने “मी आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल मला अप्सरा…’ असं धक्कादायक विधान केलं होत. तर इतकेच नव्हे तर त्याने २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते.
काय आहे नेमकं प्रकरण…
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.