मुंबई – मूळचा मराठी असलेल्या, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची राजकीय भेट घेतली नसून सदिच्छा भेट घेतली आहे.
रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांशी चांगले संबंध आहे. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असली तरी या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
उद्धव ठाकरेंसाठी सध्याचा काळ कठिण असून त्यांच्या जवळील अनेक मंडळी त्यांच्यापासून दुरावले आहेत. पण तरीही रजनीकांत यांनी न विसरता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेदेखील उपस्थित होते.