तेराशे मैल प्रतितास वेग असलेली सुपरसॉनिक विमाने पुन्हा उड्डाण घेणार

वॉशिंग्टन – 1980च्या दशकामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या सुपरसॉनिक विमानाचे युग परत एकदा अवतरणार असून येत्या पाच वर्षात प्रथमच सुपरसॉनिक पद्धतीची विमाने आता आकाशात उड्डाणे घेणार आहेत. सुपरसोनिक काँकर्ड जातीची विमाने प्रवासी वाहतुकीसाठी अतिशय लोकप्रिय ठरली होती. 

पण महाग विमानप्रवास आणि अपघातांची भीती यामुळे ह्या विमानांची उड्डाणे काही वर्षांपूर्वी थांबविण्यात आली होती. पण आता येत्या पाच वर्षांच्या कालावधीत पुन्हा एकदा सुपरसॉनिक विमान आकाशात उडताना दिसणार आहेत.

डेनेव्हर येथील एअरस्पेस कंपनी बूम सुपरसोनिक यांनी ओव्हर्चर नावाचे आपले विमान निर्माण करण्याची तयारी केले असून ते येत्या पाच वर्षांमध्ये आकाशातील हजार फूट उंचीवर हे विमान उड्डाण करणार आहे.

तेराशे मैल प्रतितास हा या विमानाचा वेग असणार आहे. नुयोर्क ते लंडन हे अंतर फक्त साडेतीन तासात समाप्त होणार आहे. या विमान प्रवासाला सध्या साडेसहा तास लागतात नव्हे सुपर सुपरसोनिक विमान पर्यावरण पूरक इंधनावर चालणार असून ज्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्य राहणार आहे.

प्रख्यात एअरलाईन्स कंपनी युनायटेडने या 15 विमानांची सध्या ऑर्डर दिली आहे. 2025 मध्ये पहिले विमान तयार होणार असून 2026 मध्ये त्याची पहिली टेस्ट राईड केली जाणार आहे. २०२९ मध्ये या विमानाचा पहिला प्रवासी उड्डाण होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.