आधी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सरकारी एमएसटीसीचा शेअर मागील आठवड्यात 38 टक्क्यांनी वाढला व त्यानं 163.3 हा आपला 52 आठवडी उच्चांक नोंदवला. कंपनीनं लागोपाठ दोन दिवसांत दोन कंपन्यांबरोबर व्यवहार ठरवले आहेत.
6 नोव्हेंबर रोजी, दोन्ही पक्षांनी 29 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या विक्री एजन्सी कराराच्या अटीनुसार लार्सन आणि टुब्रो कंपनीनं त्यांच्या भारतातील विभागातील स्क्रॅपच्या विक्रीसाठी व टाकावू / अप्रचलित दुय्यम जुनाट (फेरस व नॉन फेरस) तसंच अतिरिक्त अप्रचलित स्टोअर्स, उपकरणं आणि विविध वस्तू इ., इमारती आणि क7;00 ारखान्यांसाठी आय.सी. एम.एस.टी.सी. च्या ई-लिलाव वेबसाइटद्वारे विक्री एजंट म्हणून कंपनीची नियुक्ती केली.
लगेचच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता विक्री ई-ऑक्शन सेवांसाठी कंपनीने बर्न स्टॅंडर्ड कंपनी लिमिटेड सह सामंजस्य करार केला, जो 31 मार्च 2020 पर्यंत कायम राहणार आहे. मार्च 2019 मध्ये नोंदणी झालेल्या कोलकाताच्या या कंपनीचे शेअर्स गेल्या तीनच महिन्यात दुप्पटीपेक्षा जास्त वाढले आहेत.