सुपरशेअर : अदानी ग्रीन

अदानी समूहामधील अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीचा शेअर मागील आठवड्यात साडेतेरा पट वधारला. कारण होतं, अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी डॉलर्स बाँडची विक्री करुन ३६२.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी सध्याच्या कर्जाची  पुनर्वित्तव्यवस्था (रिफायनान्स) करण्यासाठी व भांडवली खर्चास पाठिंबा देण्यासाठी उभी करू शकली.

अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी, सौरऊर्जा (सोलर पॉवर), पवनऊर्जा (विंडपॉवर), संकरीत ऊर्जा (हायब्रीड पॉवर) सोलर पार्क, आदी माध्यमांतून ५२९० मेगावॉट ऊर्जा तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे. त्यासाठी असलेलं कर्ज फेडण्यासाठी कंपनीनं २० वर्षांच्या मॅच्युरिटी करिता ४.६२५% यील्ड देणाऱ्या रोख्यांद्वारे निधी उभा केला आहे.

सध्या कंपनीकडं २ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या ऑर्डर्स असून पॅसिफिक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी, फिडेलिटी, इस्टस्प्रिंग यांसारख्या जागतिक गुंतवणूक कंपन्या डोळे लावून बसल्या आहेत. त्यामुळं, दोलायमान बाजारात देखील एक महिन्यापूर्वी ४५ रुपयांवर असलेला या कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी ६५ रुपयांवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या ४८ रुपयांवर खरेदी केला असल्यास ७०-७२ उद्दिष्ट ठेवण्यास हरकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.