मुंबई – नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हृतिक रोशन सोबत ‘सुपर ३०’ चित्रपटात झळकली होती. जॉन अब्राहमसोबत ‘बाटला हाऊस’ चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. आता दिग्दर्शक करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये तिची वर्णी लागली आहे. आगामी ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
दरम्यान, मृणाल ठाकूरने या वेबसीरिजच्या क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज दाखण्यात येणार आहे. ‘घोस्ट स्टोरीज’ वेबसीरिजनंतर मृणाल फरहान अख्तरसोबतही ‘तुफान’ चित्रपटात दिसणार आहे.