लंडन -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला विजतेपद मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी जीतकी कठोर मेहनत घ्यावी लागेल तितकी घेण्याची तयारी आहे, असा निर्धार भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने व्यक्त केला आहे. भारतीय संघाचे रनमशिन अशी सार्थ ओळख असलेल्या कोहलीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा केल्या. त्याचा रॉयल ॅलेंजर बंगळुरुचा संघ प्लेऑफ गाठू शकला नाही व त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपूष्टात आले.
मात्र, आता हा सर्व भूतकाळ झाल्याचे कोहलीने म्हटले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. फिटनेस किंग असलेल्या विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर चषकातही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती.
त्यामुळे कोहलीची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगलीच धडकी भरली आहे. आयपीएलमधून आव्हान संपुष्टात आल्यानंतर कोहलीने इंग्लंडमध्ये कसून सराव सुरू केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका फोटोमध्ये कोहली नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, शार्दुल ठाकुर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. राखीव – यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव,
मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलॅंड, ऍलेक्स केरी, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लेबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि
मॅथ्यू रेनशॉ.