पुणे: पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम) येथे करोनाबाधित कर्मचारी आढळल्याने संस्थेतील महासंगणकांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
संबंधित बाधित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच संस्थेत औषध फवारणीनंतर महासंगणकांचे कामकाज पुन्हा सुरू केल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
हवामानविषयक संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या “आयआयटीएम’ संस्थेच्या आयटी विभागातील एक कर्मचारी रविवारी (दि.21) करोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संस्थेने त्वरित संपूर्ण कामकाज बंद केले.
यादरम्यान संस्थेतील “प्रत्युश’ आणि “आदित्य’ या महासंगणकाचे कामकाजही बंद करत, त्यासंबंधीची सेवा नोएडा येथील महासंगणकाकडे हस्तांतरित करण्यात आली.