पुणे – विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सनस्टोन एज्युवर्सिटी आपली सुरुवात करत असून त्यासाठी आदित्य ग्रुप ऑफ कॉलेजेसची सोबत मिळाली आहे. सनस्टोन एज्युवर्सिटीने विद्यार्थ्यांसाठी अभिनव कोर्सेस आणले असून त्यात P(Pay Placement-आधी नोकरी मग फी) आणि MBG (Money Back Guarantee-पैसे परत हमी) एमबीए यांचा समावेश आहे.
आयएमटी-गाझियाबादचे माजी विद्यार्थी आशिष मुंजाळ आणि पियुष नांगरू यांच्या पुढाकाराने सनस्टोन एज्युवर्सिटीची स्थापना झाली. मुंजाळ म्हणाले की, सनस्टोन एज्युवर्सिटीचा उद्योगपूरक अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी यामुळे करिअरमध्ये उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना हाच उत्तम पर्याय आहे.
सनस्टोन एज्युवर्सिटीने 2019-20 या वर्षात 252 पैकी 175 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या. यामध्ये बीवायजेयू,ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स, झोमॅटो आणि पेटीएम या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा: https://sunstone.edu.in/
विद्यार्थ्यांच्या करिअरची जबाबदारी घेऊन, त्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी सनस्टोन एज्युवर्सिटी मदत करते. सनस्टोन एज्युवर्सिटीने तयार केलेल्या फी भरण्याच्या पद्धतीत विद्यार्थी आर्थिकदृष्टया स्वावलंबी होऊन, आपल्या पगारातून फीचे पैसे अदा करू शकतात.