Gold-Silver Price Today | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – सलग तिसऱ्या दिवशी भारतीय सराफात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारात होत आहे. शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 97 रुपयांनी वाढून 46,257 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र चांदीचा दर शुक्रवारी 275 रुपयानी कमी होऊन 66,253 रुपये प्रति किलो झाला.

याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले की, वायदे बाजारात सध्या सोन्याचे जर कमालीचे अस्थिर आहेत. दरम्यानच्या काळामध्ये रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी रुपयाचा भाव 17 पैशांनी कमी झाला.

त्याचा सोन्याच्या आयातीवर परिणाम होत आहे. जागतीक बाजारात सोन्याचे दर 1,745 डॉलर तर चांदीचे दर 25.15 डॉलर प्रति औंस झाले. डॉलर वधारत असल्यामुळे सोने विकून काही जण नफा कमावत असल्याचे पटेल यांनी सांगितले.

सध्या सोन्याचे दर जरी 46 हजार रुपयांच्या वर असले तरी तुलनेने ते खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती योग्य आहे. विशेषतः लग्नात ज्यांना सोन्याचा वापर करायचा आहेत त्यांनी सध्या सोने खरेदी करायला हरकत नाही असे विश्‍लेषक सुचवितात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.