सारजा – वृद्धिमान साहा याच्या आक्रमक खेळीनंतर अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत 20 षटकांत 7 बाद 134 धावाच करता आल्या.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरणार का असे वाटावे अशी आक्रमक फलंदाजी साहा याने केली. मात्र अर्धशतकाजवल आल्यावर तो बाद झाला आणि मग मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले.
साहाने आपल्या 44 धावांच्या खेळीत46 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यानंतर अभिषेक शर्मा, अब्दुल समद आणि रशीद खान यांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. त्यांनी थोड्याफार दावा केल्यामुळेच संघाला थोडीतरी प्रतिष्ठा जपता आली.
त्यांचा कर्णधार केन विल्यमसन याचे अपयश त्यंना सातत्याने भोवत आहे. या सामन्यातही त्याला चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होने पायचीत केले. ब्राव्होसह जेश हेझलवूडनेही हैदराबादच्या फलंदाजांवर सातत्याने दडपण राखले. हेझलवुडने 3 तर ब्राव्होने 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजा व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 7 बाद 134 धावा. (वृद्धिमान साहा 44, अभिषेक शर्मा 18, अब्दुल समद 18, रशीद खान 17, जोश हेझलवुड 3-24, ड्वेन ब्राव्हो 2-17, रवींद्र जडेजा 1-14, शार्दुल ठाकूर 1-37).