अभिनेत्री सनी लियोनी तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठी सर्वांना परिचित आहे. सनी लियोनीने अनेक चित्रपटात याची झलक प्रेक्षकांना दाखविली आहे. तसेच “रईस’ चित्रपटातील “लैला मैं लैला’वर तिले लावलेले ठुमके चाहत्यांना आजही आठवतात.
या गाण्यावर सनीने पुन्हा एकदा ठुमका धरत चाहत्यांना इम्प्रेस केले आहे.
सनी लियोनीने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्स रिहर्सलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती “लैला मैं लैला’ या गाण्यावर सराव करताना दिसते. व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक पॅट्समध्ये सनी दमदार ठुमके घेताना दिसते.
सनीच्या चित्रपटसृष्टीतील कारर्किदीबाबत सांगायचे झाल्यास तिने 2012मध्ये “जिस्म-2′ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले. यानंतर “जॅकपॉट’, “रागिनी एमएमएस-2′ “एक पहेली लीला’, “कुछ कुछ लोचा है’ आणि “”रईस’ यासारख्या अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारला आहे.
आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले नशिब आजमाविणार आहे. ती लवकर “वीरामादेवी’ या तमिळ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे “कोका कोला’ हा एक हॉरर कॉमिडी चित्रपटही साकारत आहे.