नवी दिल्ली – बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ( Dharmendra birthday ) यांचा आज वाढदिवस (8 डिसेंबर) धर्मेंद्र आज 88 वर्षांचे झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाहते धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्याच्या जुहूतील घराबाहेर पोहोचले. यावेळी चाहत्यांनी मोठं मोठे पोस्टर्स लावून केक कापून धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा केला. ( Bollywood actor birthday )
सनी देओलने ( Sunny Deol ) त्याच्या वडिलांचा वाढदिवस चाहत्यांसाठी आणखी खास बनवला. यावेळी, केक कापताना सनी चांगलाच भावूक झाला.धर्मेंद्रसाठी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जुहूच्या घरी 7 टियर केक आणला होता, ज्यावर लिहिले होते, “धर्मेंद्र एक अनमोल रतन, इंटरनॅशनल फॅन क्लब”. याशिवाय केकच्या वर एक मुकुट बनवण्यात आला होता. याशिवाय संपूर्ण केकभोवती धर्मेंद्रचे फोटोही लावण्यात आले होते.
सनी देओलने जुहू येथील घरी चाहत्यांसोबत आणि मीडियाच्या उपस्थितीत केक कटिंग केले. मात्र, यावेळी चाहत्यांचे वडिलांवरील प्रेम पाहून अभिनेता चांगलाच भावूक झाला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सनी देओल त्याच्या वडिलांच्या केक कटिंगच्या वेळी रुमालाने अश्रू पुसताना दिसत आहे,
View this post on Instagram
केक कापताना चाहत्यांनी त्याच्यावर आणि मुलगा सनी देओलवर फुलांचा वर्षाव केला आणि चाहत्यांनी एकत्र वाढदिवसाचे गाणे गायले.या सेलिब्रेशननंतर सनी देओल यांनी सर्व चाहत्यांचे आभार देखील मानले.