त्रिनिदाद :- कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी त्रिनबागो नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरेन क्रिकेटमध्ये रेडकार्ड मिळवणारा पहिला खेळाडू बनला. रविवारी कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2023)च्या सामन्यादरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.
कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये यंदापासून गैरवर्तन केलेल्या खेळाडूंना प्रायोगिक तत्वावर रेड कार्ड दाखवण्याच्या नियमाचा अवलंब करण्यात येणार होता.
याच नियमांतर्गत वेस्ट इंडिजचा प्रख्यात क्रिकेटपटू व लीगमधील टीकेआर संघाचा खेळाडू असलेल्या सुनील नरेनला पंचांनी रेड कार्ड दाखवले व मैदानाबाहेरही काढले.
त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूशी तसेच पंचांशीही गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला व क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच रेड कार्ड दिले गेले.