राष्ट्रपतींना सुनील अरोरांनी सोपविली विजेत्यांची यादी

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज लोकसभा निवडणूक 2019 च्या विजेत्यांची यादी राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांना दिली आहे. यंदाची लोकसभेची निवडणूक देशभरामध्ये ७ टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे. दरम्यान, या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींच्या नावाची मोहर उठवली आहे. मोदींचा शपथविधी गुरुवारी, 30 मे रोजी पार पडणार, अशी चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.