मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र, महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) प्रकरणामुळे जॅकलीन चांगलीच अडचणीत आली. आता देखील तुरुंगात असलेल्या सुकेशमुळे जॅकलिन चर्चेत आहे. सुकेश तुरुंगातून चक्क जॅकलिनसाठी नवरात्रीचे उपवास धरणार असल्याचं बोललं जात आहे.(Sukesh Chandrasekhar keep Navratri fast)
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandes) पत्र लिहिले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात जॅकलीन फर्नांडिससाठी नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणार असल्याचे म्हंटले आहे. सुकेशने आपल्या पत्रात जॅकलिनचे वर्णन जगातील सर्वात सुंदर महिला असे देखील केले आहे. (Sukesh letter to Jacqueline)
सुकेशने पत्रात लिहिले की, ‘माझी बेबी जॅकलीन, दोहा शो दरम्यान तू खूप हॉट आणि सुंदर दिसत होतीस. बेबी, माझ्या प्रिय, तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. या काळात मी प्रथमच नऊ दिवस उपवास करणार आहे. यानंतर देवी माँ सर्व काही ठीक करेल आणि आम्ही लवकरच एकमेकांसोबत असू, काहीही झाले तरीही आणि कधीही वेगळे होणार नाही असं सुकेशने आपल्या पत्रात म्हंटले आहे.(Navratri2024)
यापूर्वी सुकेशने अभिनेत्री जॅकलिन (Sukesh Jacqueline) आणि तिच्या कुटुंबावर 10 कोटी रुपये खर्च केले. तो चार वेळा जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि चार्टर्ड प्लेनवर 8 कोटी रुपये खर्च केले. तसेच तिला अनेक महागडे गिफ्ट देखील दिले आहेत. ज्याची चर्चा आज देखील सगळीकडे होताना दिसत आहे.