World Cup 2023 : विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत न्यूझीलंड संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यांन आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. तथापि, 18 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. नुकताच दुखापतीतून परतलेला कर्णधार केन विल्यमसन पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. 2023 च्या विश्वचषकातील हा केन विल्यमसनचा पहिला सामना होता. मात्र, आता तो दुखापतीमुळे जवळपास महिनाभर संघाबाहेर आहे.
बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात विल्यमसनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वास्तविक, बांगलादेशी क्षेत्ररक्षकाचा थ्रो थेट धाव घेत असलेल्या विल्यम्सच्या अंगठ्याला लागला. त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने विल्यमसन रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 107 चेंडूत 78 धावा केल्या. केन पुन्हा मैदानात येणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, आता सर्वांच्या पदरी निराशा आल्याचं समोर आलं आहे.
Kane Williamson will have an X-ray on his left thumb tomorrow after being hit by the ball while running between the wickets in tonight’s match against Bangladesh. #CWC23 pic.twitter.com/6a8BElmw2e
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 13, 2023
सामन्यानंतरच्या तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. न्यूझीलंड क्रिकेटने शनिवारी याची अधिकृत माहिती दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एक्स(ट्विटर) पोस्टमध्ये लिहिले की,” केन विलियम्सनच्या एक्स रे रिपोर्टमधून डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी करण्यात आली आहे. मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या पूल लेग सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी उपलब्ध राहण्याच्या उद्देशाने तो वर्ल्ड कप स्कॉडमध्ये कायम राहणार असल्याचं देखील न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. केनच्या दुखापतीनंतर आता टॉम ब्लंडेल भारताच्या दिशेने रवाना झाला आहे.
An X-ray has confirmed an undisplaced fracture to Kane Williamson’s left thumb.
He will remain in the @cricketworldcup squad with the aim of being available for the back end of pool play next month.
Tom Blundell will travel to India as cover. #CWC23 https://t.co/5CjHG0FV9h
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 14, 2023
प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की, विल्यमसन तंदुरुस्त होईल आणि तो राऊंड रॉबिन टप्प्यातील शेवटचे काही सामने खेळेल. ते म्हणाले की, ब्लंडेल पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यावर संघासोबत होता आणि त्याने चांगली कामगिरी केली होती. तो फलंदाजीच्या क्रमाने कुठेही खेळू शकतो. विकेटकीपिंगही करू शकतो. न्यूझीलंडचा पुढचा सामना बुधवारी चेन्नईत अफगाणिस्तानशी होणार आहे आणि ब्लंडेल यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
या वर्षी 2023 मार्चमध्ये आयपीएलदरम्यान विल्यमसनलाही दुखापत झाली होती. गुजरात टायटन्सकडून खेळताना विल्यमसनचा खांदा मोडला. यानंतर त्याला सावरायला आठ महिने लागले. या विश्वचषकात त्याने पुनरागमन केले होते. शुक्रवारी विश्वचषत स्पर्धेत झालेला बांगलादेशविरुद्धचा हा त्याचा पहिलाच सामना होता. आता त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नऊ गडी राखून, दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 99 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा आठ विकेट राखून पराभव केला.