पुणे -‘आमच्या परिसरात राहायचे नाही, अन्यथा जीवे मारुन टाकू’ अशा सततच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून हडपसर भागातील एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याकुब मुस्तफा शेख (64), सलिम याकुब शेख (23), आतिफ याकुब शेख (26. सर्व. रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, गणेश भिमा देवकुळे (37) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.