सातारा(प्रतिनिधी) : येथील सोमवार पेठेत एका युवतीने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणीचा तपास रात्री उशीरापर्यंत शाहूपुरी पोलीस करत होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुमारी वैष्णवी संजय कानडे (रा. ११८, सोमवार पेठ, सातारा) हिने आज दुपारी १२.३८ च्या सुमारास आई-वडिल बाहेर गेले असताना घरात गळपास घेवून आत्महत्या केली. आई-वडिलांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला तत्काळ समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून, पोलीस तपास करत आहे. रात्री उशीरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.