सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियामध्ये बरीच लोकप्रिय आहे. सुहानाच्या नावावर अनेक फॅन क्लब सुरू झाले आहेत. आपल्या फॅशन स्टेटमेंटद्वारे प्रेक्षकांना आकर्षित केल्यानंतर सुहाना खानच्या आता तिच्या डान्स स्कीलबद्दलही चर्चा व्हायला लागली आहे.
सुहाना सध्या आंतरराष्ट्रीय बेली डान्सर असलेल्या संजना मुथरेजा कडून डान्सचे धडे घेत आहे. संजनाने नुकतेच इंस्टाग्रामवर तिच्या डान्स सेशनमधून सुहानासोबत स्वतःचे एक फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये संजनाने सुहानाचा डान्स स्कीलचे कौतुक तर केलेच आहे. शिवाय तिच्या अंगभूत गुणांनी ती किती चांगली डान्सर बनू शकते, याबाबतचे आपले अनुकूल मतही नोंदवले आहे. सुहाना व्यतिरिक्त, संजनाने अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरलाही बेली डान्सचे प्रशिक्षण दिले आहे, शनाया संजना मुथरेजाकडे तीन वर्षांहून अधिक काळ शिकत आहे.
सुहानाने अलीकडेच तिच्या शॉर्ट फिल्मसाठी जो परफॉर्मन्स केला तो सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा फोटो तिच्या शाळेतल्या मैत्रिणीबरोबर बनवलेल्या एका शॉर्टफिल्ममधील आहे. यात तिच्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडते. त्याकडे बघितल्यवर सुहाना बॉलीवूडची तयारी करते आहे, हे कोणीही हे नाकारणार नाही.
सुहानाने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमध्ये चित्रपटांचे शिक्षणही घेतले. सुहानाला तिच्या वडिलांप्रमाणेच अभिनयातही करिअर करण्याची इच्छा आहे पण तिला प्रथम अभ्यास पूर्ण करण्यास सांगण्यात आले असल्याचे शाहरुखने बऱ्याच मुलाखतींमध्ये म्हटले आहे. सुहानाने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती अभिनय करण्यास सुरवात करणार आहे. शाहरुखच्या “झिरो’च्या सेटवर सुहानाने असिटंट म्हणून काम देखील केले होते. यातून ती कॅमेरामागील बारकावे शिकू शकली. आता शाहरुख आपल्या लाडक्या कन्येला बॉलिवूडमध्ये कधी लॉंच करतो, ते बघूया.