बॅंकॉक- म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग स्यान स्यू की यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याला 1 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. स्यू की यांच्या वकीलांच्या पथकातील एका सदस्याने ही माहिती दिली. राजधानी नायपितॉ येथील एका विशेष न्यायालयात दर शुक्रवारी या खटल्याची सुनावणी होणार आहे, प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मंडाले येथील तुरुंग प्रशासन आणि स्यू की यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर या खटल्याचा निकाल देण्यात येणार आहे. ÷
स्यू की यांच्या पक्षाचे निवडून आलेले सरकार लष्कराने गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये बंड करून उलथवून टाकले होते. तेंव्हापासून स्यू की या तुरुंगातच आहेत. त्यांच्यावरील अन्य खटल्यांची सुनावणी सुरू आहे. त्यांच्यावर देशद्रोह, कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीरपणे विदेशी वस्तू देशात आणणे आणि लायसन्स नसतानाही रेडीओ देशात आणण्याचे आरोप आहेत. याशिवाय सरकारी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग करण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात येणार आहे.