सुदिराम चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात

नानिंग – सुदिराम चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाला चीन विरुद्ध 0-3 अशा एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मलेशिया कडुन 2-3 असा पराभवाचा धक्‍का बसला होता. लागोपाठ दोन पराभव पत्करल्याने भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

यावेळी झालेल्या सामन्यांमध्ये प्रनव जेरी चोप्रा आणि एन सिक्‍की रेड्डी यांच्या जोडीला चिनच्या वांग यिल्यु आणि हुआंग डोंगपिंगया जोडीने 5-21, 11-21 अशा फरकाने पराभुत करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली होती.

तर, पुढच्या सामन्यात भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू समिर वर्माला ली झी जिआने 17-21, 20-22 असे संघर्षपूर्ण सामन्यात पराभुत करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर, अखेरच्या सामन्यात सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीयांचा चीनच्या हान चेंगकाई झोउ हानडोंग या जोडीने 21-18, 15-21, 17-21 असा संघर्षपूर्ण पराभव करत सामना आपल्या नावे केला.

तत्पूर्वी, भारताच्या “ड’ गटातील पहिल्या सामन्यात मलेशियाने 3-2 ने पराभूत केले होते. सात्विक साईराज रांकीरेड्डी व अश्विनी पोनप्पाने शानदार कामगिरी करीत मलेशियाच्या गोह सूप हुआत व लाई शेवोन जेमी यांचा 16-21, 21-17, 24-22 ने पराभव करीत भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतच्या स्थानी समीर वर्माला खेळविण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. वर्माला ली जी जियाने 48 मिनिटांमध्ये 21-13, 21-15 ने पराभूत केले.

ऑलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधूने गोह जिन वेईला 35 मिनिटांमध्ये 21-12, 21-8 ने पराभूत केले. त्यानंतर दुहेरीत मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांना आरोन चिया व टियो ई यी यांच्याविरुद्ध 22-20, 21-19 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अश्विनी पुन्हा एकदा मैदानात उतरली आणि एन. सिक्की रेड्डीच्या साथीने महिला दुहेरीत अंतिम फेरीत खेळली. मात्र त्यांना जागतिक क्रमवारीतील 13 व्या क्रमांकाची जोडी चोऊ मेई कुआन व ली मेंग यिआन यांच्याविरुद्ध 21-11, 21-19 ने पराभव स्वीकारावा लागला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.