कभी हां कभी ना मधील शाहरुख खानची हीरोइन सुचित्रा कृष्णमूर्ती करोनाची लस देण्यासाठी गेली होती. मात्र तिला लस न घेताच परत यावे लागले. करोनाचे रुग्ण जसे वाढायला लागले, तसे अनेक शहरात बेडस, ऑक्सिज्न आणि लसींचा तुटवडा भासायला लागला होता.
सुचित्रा कृष्णमूर्तीच्या हॉस्पिटलमध्ये लस देण्यासाठी गेली होती, तिथला लसीचा साठा संपल्यामुळे तिला परत यावे लागले होते. देशात लस कमी पडत असल्याची अफवा पसरली होती, असे तिला वाटले होते. मात्र तिने प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर तिला विश्वास ठेवावा लागला. तिने एका ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे. नंतर कदाचित काही दिवसांनी तिला लस मिळाली असावी. पण त्याबद्दल तिने काहीही सांगितलेले नाही.