काही दिवसांपूर्वी ड्रामा क्वीन राखी सावंत हिच्या कॅन्सर पीडित आईवर ऑपरेशन केले गेले. राखी सावंतची आई दीर्घकाळापासून हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवरील इलाज घेत आहे. राखीने बऱ्याच वेळेला टिव्हीवरील कार्यक्रमातून याचा उल्लेखही केला आहे. आता राखीच्या आईवरील कॅन्सरचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. या ऑपरेशनसाठी आलेला सर्व खर्च सलमान खानने केला होता.
याबद्दल राखीने सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खानला मनापासून धन्यवाद देखील दिले आहेत. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर पत्रकारांसमोर राखीला आपल्या भावना रोखून धरता आल्या नाहीत. ती भावनाविवश होऊन रडायला लागली आणि तिने तिथेच गुडघे टेकून सलमानचे आभारही मानले. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.