Hemangi kavi: मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi kavi) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियाद्वारे शेअर करते. तिच्या कामाबाबत किंवा खासगी आयुष्यामधील काही प्रसंगाबाबतची माहिती ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. मात्र अनेकदा हेमांगीला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र ती शांत न राहता ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकतंच हेमांगीने एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.
हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका व्यक्तीने अश्लील कमेंट केली होती. त्यानंतर हेमांगीने अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम BIO मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, आर्मी, बाप्पा लव्हर असे लिहिण्यात आले होते. त्यावर तिने संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे हेमांगीच्या या पोस्टनंतर त्या युझरने कमेंट डिलीट केली आहे.
हेमांगी कवी पोस्टमध्ये काय म्हणाली?
“BIO मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा , इंडियन आर्मी आणि प्रत्यक्षात वागताना? असली माणसं आतून जनावरच असतात. ‘माणसा’चं कातडं घालून समाजात हिंडत असतात. हे कुठल्याही चित्रपट , नाटकापेक्षा घातक आहे. चित्रपट काल्पनिक असतो, पण अशी जनावरं आपल्या आजूबाजूला आहेत, खरीखुरी. वार करतात पण पकडलेही जात नाहीत. हा माझ्यासाठी violence च आहे. मी हे स्टोरीमध्ये पोस्ट केल्यावर याने कमेंट डिलिट केली आहे. म्हणून ही स्टोरी तुम्हाला दिसत नाही. चला, आपण आपल्या BIO मध्ये ज्यांचा उल्लेख केला, त्यांची आठवण आली असावी. चांगलंय!” असं हेमांगीनं म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या हेमांगी कवी सध्या एका हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. याशिवाय तिने हेमंगीने याआधी ‘तेरी लाडली मै’ या हिंदी मालिकेत दिसली होती. याशिवाय ती सुष्मिता सेनसोबत ताली या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. क्रिकेटर युवराज सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत स्क्रीन शेअर केली आहे.