samantha ruth prabhu – रिअॅलिटी शो एमटीव्ही हसल आणखी एका सीझनसह परतला आहे. आगामी एपिसोडमध्ये, अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने हजेरी लावली. सोशल मीडियावर तिचे या शोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत.व्हिडिओत समंथा केडेन शर्माच्या रॅपमध्ये रमताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान सामंथाने शोमध्ये हजेरी लावलेल्या एपिसोडचा प्रोमो शेअर करताना, MTV हसलच्या सोशल मीडिया पेजवर लिहिले, “सुपरस्टार सामंथा के आने से होगी इस वीक की वाइब एकदुम टॉप!” व्हिडिओमध्ये सामंथा दिसून येत आहे. हिप-हॉपला प्रोत्साहन देणारा हा एकमेव भारतीय शो आहे” असे म्हणताना ऐकू येत आहे.
शोमध्ये जज असलेला बादशाह आणि समंथा सर्व एकत्र एन्जॉय करतांना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये स्पर्धकांसाठी चिअर करताना दिसतात. सामंथा स्टेजवर स्पर्धकांसोबत मस्ती करतांना दिसत आहे. सामंथाने त्यांच्यासोबत डान्सही केलेला दिसून येत आहे.
इंटरनेटवरील चाहत्यांनी समंथा रुथ प्रभूचे कौतुक केले. एका चाहत्याने लिहिले, ‘मी पाहिलेले सर्वात सुंदर हास्य.’ दुसर्या चाहत्याने लिहिले आहे की,’हिप-हॉपला तिने सपोर्ट करून नवीन ट्रेंड सेट केला आहे.’ बादशाहने इंस्टाग्रामवर सामंथा रुथ प्रभूसोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा सामंथा हसल स्टेजला ग्रेस करते तेव्हा 3X jyada dhamake अनुभवण्यासाठी तयार व्हा! ट्यून राहा.”
सामंथाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ती विजय देवरकोंडा सोबत ख़ुशीमध्ये दिसली होती. ती पुढे सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीत दिसणार आहे. राज आणि डीके द्वारे निर्मित, यात वरुण धवन देखील मुख्य भूमिकेत आहे.