नेवासा, (प्रतिनिधी) – श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी क्रमांक तीनजवळ असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये दि.११ ते १८ एप्रिल या कालावधीत रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय तुलसी रामायण कथा सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळयाची जय्यत तयारी सुरूअसल्याची माहिती सोहळयाचे प्रमुख महंत श्री सुनीलगिरी महाराज यांनी दिली.
दि.११ ते दि.१७ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते १२ यावेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवात दि.११ एप्रिल रोजी हभप दयानंद महाराज कोरेगावकर, दि.१२ एप्रिल रोजी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज, दि.१३ एप्रिल रोजी बीड येथील हभप श्री अमृताश्रम स्वामी महाराज, दि.१४ एप्रिल रोजी बीड येथील महादेव महाराज राऊत, दि.१५ एप्रिल रोजी सावखेडा येथील गिरी आश्रमाचे महंत कैलासगिरी महाराज,
दि.१६ एप्रिल रोजी साध्वी सुवर्णानंद चैतन्य, दि.१७ एप्रिल रोजी रामनवमी निमित्त महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे संगमनेर यांचे कीर्तन होणार असून, दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करून श्री रामजन्मोत्सव साजरा होणार आहे.
दि.१८ एप्रिल रोजी हभप पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आठ दिवस चालणाऱ्या श्री रामजन्मोत्सव व कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे. दुपारी ३ वाजता त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक मेजर साहेबराव घाडगे पाटील यांच्या सौजन्याने कुस्त्यांचा जंगी होणार आहे.