तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – मावळ लोकसभा आढावा बैठक काँग्रेस भवन पुणे येथे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मावळ लोकसभा मतदार संघासाठी समन्वय समितीची स्थापना काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज यांनी दिली.
यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, युवक अध्यक्ष राजेश वाघोले, देहूरोड ब्लॉक अध्यक्ष हाजीमलंग मारीमत्तू, प्रमोद गायकवाड, दिलीप ढमाले, राजीव फलके, प्रीतम हिरे, माऊली काळोखे यांचा समावेश आहे.
लवकरच मावळ लोकसभेमध्ये शिवसेना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे नियोजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. या वेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक कौस्तुभ गुजर, खजिनदार बापूसाहेब ढमढेरे, संग्राम मोहोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.