success story । ही गोष्ट आहे त्या मुलीची जिचे वडील भारतीय सेनेत कर्तव्य बजावतांना शाहिद झाले. तेव्हा ती फक्त तीन वर्षाची होती.आता ती ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली. मात्र, लष्करात रुजू होताना तिने वडिलांचा गणवेश धारण केला होता.सध्या तिचे सोशल मीडियावर खूप कोतुक होत आहे. तिचे नाव आहे.’इनायत वत्स’तर जाणून घेऊया तिच्या संघर्षाची कहाणी…
Lieutenant Inayat Vats who lost her father Major Navneet Vats in a counter-insurgency operation commissioned into the Indian Army today and donned the same uniform that her hero dad once did: Indian Army pic.twitter.com/yIXvJuGDgn
— ANI (@ANI) March 9, 2024
‘इनायत वत्स’चे वडील मेजर नवनीत वत्स हे २००३ मध्ये कश्मीरच्या दहशतवाडी हल्यात शहीद झाले.त्यांना मरणोपरांत सेना पदकने सन्मानित करण्यात आले.तर ‘इनायत वत्स’ हरियाणाची रहिवासी आहे.तिने दिल्लीतील पदवीधर शिक्षण पूर्ण केले काल इनायत वत्स भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या. तिने अप्रैल 2024 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA)चेन्नई येथे प्रवेश घेतला.
तिने दिल्ली यूनिवर्सिटीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रेजुएशन केले आहे.
लष्करात रुजू होताना तिने वडिलांचा गणवेश धारण करण्याच्या निर्णयामुळे आई झाली भावुक म्हणाली?
इनायत वत्सची आई शिवानी वत्स भावूकपणे म्हणाली, “ती एका शूर माणसाची मुलगी आहे. इनायतने जेव्हा पदवीचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा राज्य सरकारने दिलेली नोकरी ती करेल असे सर्वांना वाटले होते. ती एका शहीद जवानाची मुलगी आहे आणि सैन्यात सामील होण्यासाठी तिच्यासाठी हे स्वाभाविक होते..”
इनायत वत्सची आई शिवानी म्हणाली, ‘माझ्या मुलीने मला एकदा विचारले होते की मी मुलगा असतो तर तू काय केले असते? यावर मी तिला सांगितले की मी त्याला नक्कीच एनडीए किंवा आयएमएमध्ये सामील होण्यास सांगितले असते. मला आनंद आहे की, आरामदायी जीवन जगण्याचा पर्याय असूनही, माझ्या मुलीने आपल्या वडिलांच्या मार्गाचा अवलंब केला आणि सैन्यात भरती झाली.”
हेही वाचा
निवडणुकानंतर पंतप्रधान मोदी सरकार भारतातच संविधान बदलणार ? रामदास आठवले म्हणाले,’…बदलणं!’