Kushal Badrike New Show| ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहचला. मागील 10 वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा शो निरोप घेणार आहे. यानंतर कुशल एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सोशल मीडियावर कुशल नेहमीच सक्रिय असल्याचे दिसते. अनेक व्हिडिओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने त्याचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.
कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात कुशलने त्याच्या आगामी हिंदी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “आजपासून नवीन सुरुवात होत आहे. तुमचा आशीर्वाद पाठीशी असुद्या. तुमच्या शुभेच्छांची खूप खूप गरज आहे. सोनी हिंदी, शनिवार रविवार 9:30 वाजता.” त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, कुशल बद्रिके हा लवकरच सोनी टीव्ही या वाहिनीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे. ‘मॅडनेस मचायेंगे’ हा नवा कार्यक्रम ‘कपिल शर्मा शो’ च्या जागी सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमा कुरेशी करणार आहे. या नव्या शोच्या माध्यमातून कुशल पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ‘रावरंभ’ ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील अनेक वर्ष काम केल्यानंतर आता लवकरच तो सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. त्याचा हा नवा शो पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.
हेही वाचा :
“चुनाव आयोग हा भाजपाचा ‘चुना लगाव आयोग’ झाला”; ‘या’ नेत्याने लगावला टोला