Success Story : आयुष्यात कितीही अडचणी येत असल्या तरी कठोर परिश्रम आणि इछाशशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळू शकते. कारण जगात असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या आयुष्यात समस्या आल्यानंतर घाबरून असा विचार करतात कि आयुष्यात आता काही उरले नाही. पण या उलट असे अनेक लोक आहेत जे अडचणींनाही मोठ्या धैर्याने सामोरे जातात आणि यश मिळवतात. आज अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आम्ही तुम्हाला आहोत, ज्यांनी एकेकाळी बसमध्ये आणि घरोघरी जाऊन पेनविक्री करायचे पण आज ते हजारो कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या या कठोर परिश्रमामुळेच आज जग त्यांना भारतातील ‘इन्व्हर्टर मॅन’ म्हणून ओळखतं. चला तर मग आजच्या Success Story च्या सेगमेंटमध्ये जाणून घेऊया याच ‘इन्व्हर्टर मॅन’ म्हणजेच सु-काम कंपनीचे संस्थापक कुंवर सचदेव यांचा प्रेरणादायी प्रवास….
कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेत लिपिक होते. कुंवर सचदेव यांनी प्राथमिक शाळेपर्यंतचे शिक्षण खासगी शाळेत केले, मात्र पैशाअभावी त्यांना पुढील शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण करावे लागले. कुंवर यांना डॉक्टर व्हायचे होते. मात्र वैद्यकीय प्रवेश न मिळाल्याने त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले. त्यानंतर आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्यासाठी त्यांनी घरोघरी पेन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. यावेळी त्यांनी बसमध्ये आणि घराघरात जाऊन पेन विक्री केली आणि त्यासोबत कठोर परिश्रम करून आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला.
पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंवर एका केबल कम्युनिकेशन कंपनीच्या मार्केटिंग विभागात काम करू लागले. याठिकाणी त्यांना देशातील केबल व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकेल असे वाटले. यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुंवर सचदेव यांनी सु-काम कम्युनिकेशन सिस्टीम या नावाने व्यवसाय सुरू केला.
इन्व्हर्टर कंपनी केली सुरू
कुंवर सचदेव यांनी एका मुलाखतीती सांगितले होते कि, त्यांच्या घरात इन्व्हर्टर होता. तो पुन्हा पुन्हा खराब व्हायचा. एकदा त्याने ते स्वतः उघडले, तेव्हा त्याला समजले की ही समस्या निकृष्ट दर्जाच्या सामग्रीमुळे झाली आहे. यानंतर त्यांनी स्वतः इन्व्हर्टर बनवण्याचा विचार केला आणि 1998 मध्ये त्यांनी सु-कॅम पॉवर सिस्टम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आपल्या उत्पादनाविषयी लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी कुंवर सचदेव यांना कष्ट घ्यावे लागले.मात्र हळूहळू लोकांना त्यांच्या कंपनीच्या इन्व्हर्टर विषयी विश्वास निर्माण होत गेला. याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी आआज त्यांनी आपला कोट्यवधींचा व्यवसाय उभारला आहे.आता कुंवर सचदेव यांची कंपनी अनेक सोलर उत्पादने बनवते. ज्याची मागणी भारतातच नाही तर परदेशातही आहे.
करोडोच्या कंपनीचा मालक
अपार काष्ठाच्या जोरावर आज कुंवर सचदेव तब्बल 2300 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीत सौरउत्पादनेही बनवली जातात. जी दिवसातील 10 तास वीज देऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची उत्पादने आतापर्यंत भारतातील एक लाखाहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत. आज Su-Kam च्या सोलर उत्पादनांना भारतात तसेच परदेशात मागणी आहे. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग..असंच काही कुंवर यांच्या बाबतीत घडलं जर त्यांनी त्यांच्या घराचा बिघडलेला इन्व्हर्टर दुरुस्त करण्याचा विचार केला नसता आणि स्वतः नवीन इन्व्हर्टर बनवायचा विचार केला नसता तर आज देशातील लाखो लोकांचे घर लाईट गेल्यानंतरही उजळून निघाले नसते…