Rituraj Sharma Success story| मागील काही काळापासून शेती क्षेत्रात आधुनिक बदल होत गेले. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सातत्याने होणारे बदल पाहून काही तरुण शेती व्यवसायात विविध प्रयोग करून पाहत आहेत. यातच आता राजस्थानच्या एका 33 वर्षीय तरुणाने प्रगतशील शेती करत मोठे यश संपादन केले आहे. या तरुणाचे नाव ऋतुराज शर्मा असे आहे. त्याने नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केले आणि याद्वारे करोडो रुपयांची एक कंपनी स्थापन केली आहे.
राजस्थानच्या गुडगावमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या तरुणाने झेटाफार्म्स ही कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा आहेत, B.Tech आणि MBA केल्यानंतर ऋतुराजने नोकरीऐवजी स्टार्टअपने सुरुवात केली आणि झेटाफार्म्स हा त्यांचा तिसरा स्टार्टअप आहे. झेटाफार्म्स शेतीतून करोडो नफा कसा कमावत आहे.
झेटाफार्म्सचा 15 राज्यांमध्ये विस्तार
ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते, ज्यामध्ये ते एका व्यक्तीकडून किमान 50 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतात आणि 100 एकर जमीन एका गटाकडून घेतात. त्यानंतर ते त्या जमिनीवर शेती करतात. झेटाफार्म्स 2023 पर्यंत 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत होती. त्यामध्ये सुमारे 60 पिके घेतली जातात. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती करतात. अवघ्या 3 वर्षे शेती करुन त्याने 1200 कोटींची कंपनी उभारली आहे.
ऋतुराजने शेती व्यवसायाला कसे केले यशस्वी? Rituraj Sharma Success story|
सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती सुरू केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला पण नंतर झपाट्याने काम वाढवले. एका ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत झेटाफार्म्स पिक विविधतेवर काम करते. वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात.
झेटाफार्म्स द्वारे कसे केले जाते काम? Rituraj Sharma Success story|
झेटाफार्म्सद्वारे शेतीचे काम सर्वत्र अतिशय कार्यक्षमतेने केले जाते. झेटाफार्म्स टीममध्ये ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स मधील सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञाननाचा वापर करतात.
याशिवाय ते औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील वापरतात. खासकरून हवामान अॅप्स आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या डेटा विश्लेषणाचा वापर केला जातो. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात. काही ठिकाणी शेतीसाठी पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केले जाते.
हेही वाचा:
शेअर बाजाराची घसरणीनेच ओपनिंग; सेन्सेक्स 72500 च्या खाली, निफ्टी 100 अंकांनी कोसळला