श्रीनगर – जम्मू-काश्मीर बॅंकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी श्रीनगरचे उपमहापौर शेख इम्रान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीत भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून आज कारवाई करण्यात आली.
श्रीनगरचे उपमहापौर शेख इम्रान हे केहवा ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीअंर्तगत इम्रान यांचे अन्य सहा उद्योग सुरू आहेत. केहवा ग्रुपचे जम्मू आणि काश्मीर बॅंकेतीत तब्बल 138 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. हे कर्ज विविध प्रकल्पासाठी घेण्यात आले होते.
मात्र, बॅंकाकडे सादर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणापेक्षा त्याची किमत कमी असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शेख इम्रान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कंपनीकडून बॅंकेला वन-टाईम सेटलमेंट करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता.