मंचर-मुंबई येथील नेहरु तारांगण संशोधन संस्थेला विज्ञानप्रेमी नेहमीच भेट देऊन ज्ञान अवगत करत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी येथील चालणारे संशोधनाचे काम पाहण्यासाठी आवर्जुन यावे, असे आवाहन अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी केले.
गिरवली (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्यालयात मंगळवारी (दि.3) आंबेगाव तालुका गणित आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन किरणताई वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमाताई शिंदे, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, विश्वस्त हरिश्चंद्र बालघरे, किसनराव नेहरे, सरपंच संतोष सैद, उपसरपंच राजश्री आवटे, अरुण हगवणे, विजया अभंग, केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे, धुंदा भालिंगे, कल्पना टाकळकर, अंजली चिखले, समन्वयक जनार्दन मेंगडे, महम्मद मुलाणी, प्रफुल्लचंद्र वायकर, संभाजी लोखंडे, सुभाष खेडकर, नयना बांगर यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले शालेय स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रामस्थांनी आर्थिक योगदान द्यावे.सभापती उषा कानडे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोरक्ष फापाळे यांनी केले. सुत्रसंचालन ईश्वर चासकर यांनी केले. आभार संभाजी नवले यांनी मानले.