आळंदी, (वार्ताहर) – येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांच्या वतीने श्री कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाचे मानाचे बैलजोडीचे मानकरी प्रगतशील शेतकरी तथा वस्ताद सहादू बाबुराव कु-हाडे यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीचे कार्यालयात या सत्कारप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. राम गावडे, बैलसेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुर्हाडे, चंद्रकांत कुर्हाडे, तानाजी कुर्हाडे, सुभाष कुर्हाडे, बाळासाहेब कु-हाडे, योगेश कुर्हाडे, किरण कुर्हाडे,
आकाश कुर्हाडे, गणेश गायकवाड, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वस्त विश्वबंर पाटील, प्रकाश काळे, धनाजी काळे, डॉ. राजेंद्र जाधव, महादू वीर, कैलास आव्हाळे, उद्योजक अमोल वीरकर यांचेसह ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारचे पदाधिकारी उपस्थित होते.