बेल्हे (वार्ताहर-रामदास सांगळे) – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त बेल्हे येथे ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी बेल्हे गावातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच झेंडे बनवले होते. उंच धरा रे उंच धरा, तिरंगा आपला उंच धरा, स्वच्छ भारत, सुंदर भारत, हर घर तिरंगा,घर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत विद्यार्थी मोठ्या उत्साहात रॅली मध्ये सहभागी झाले होते.
सकाळी आठ वाजता या प्रभात फेरीची सुरुवात झाली होती.या प्रभात फेरीत मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विश्वस्त दावाला कणसे,प्राचार्या विद्या गाडगे,शिक्षक,विद्यार्थी तसेच रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी ढोल ताशा व घोषणांच्या नादात बेल्हे नगरी दुमदुमली होती.