नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांना हॉस्टेल खाली करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध ठिकाणे फसलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर विद्यापीठाने हा आदेश दिला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव ए. पी सिद्द्की यांनी विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी एक निवेदन करत म्हटले आहे कि, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी यूजीसीच्या २९ एप्रिलच्या सूचनेनुसार हे निर्देश देण्यात आले आहे.
विद्यापीठाने म्हटले आहे कि, जे विद्यार्थी विद्यापीठात अडकून पडले होते, त्यांनी त्वरित विद्यापीठाचे हॉस्टेल सोडावे. विद्यापीठ ऑगस्ट महिन्यात चालू होईल तसेच सप्टेंबर पासून नियमित अभ्यास वर्गाची सुरवात करण्यात येईल. तर विद्यापीठने जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.
विद्यापीठाने निवेदनात म्हटले आहे कि, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे ग्रँथालय, रिडींग हॉल तसेच विद्यापीठाच्या सर्व सुविधा बंद राहणार आहेत. तसेच होस्टेलच्या दुरवस्था झाल्याने सुटीच्या काळात होस्टेलची दुरुस्थी करण्यात येईल.